स्फूर्ती गीत
सत्य शिवाहुन सुंदर हे
दान दिल्यानेज्ञान वाढते
त्या ज्ञानाचेमंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे ....
इथेमोल ना दामाचे
मोती होतील घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे
प्रतीक
रम्य शुभंकर हे
चिरा चिरा हा घडवावा
कळस कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा
थेंब आम्ही तर सागर हे
त्यागाला या नाव नसे
पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे
त्या छायेतील मंदिर हे
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - जोतिबाचा नवस
गीत प्रकार - चित्रगीत, स्फूर्ती गीत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा